
कॉन्स्पिरसी थेरीज अर्थात षड्यंत्र सिद्धांत उगवतात कसे? एरवी सुजाण, सुशिक्षित वगैरे असलेले लोकही त्यांवर झापडबंद विश्वास ठेवतात कसे? कटकाल्पनिकांच्या विरोधात कितीही पुरावे समोर आले तरी लोकांची श्रद्धा अबाधित राहते कशी? हे सारे नीट समजून घेण्याची आज आवश्यकता आहे. या लेखमालेत आपण अशाच विविध षड्यंत्र सिद्धांतांची माहिती घेत, त्यांमागील अवघी अभियांत्रिकी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
‘तुम्हाला माहीत आहे, तो कुणाल कामरा ‘डीप स्टेट’चा एजंट आहे. त्याने सुपारी घेतली होती ते विडंबन गीत गाण्याची. त्याशिवाय का सरकारने त्याची सगळी चौकशी करण्याची घोषणा केली? त्याचे बँक डिटेल्स, सीडीआर डेटा सगळे काही तपासले जाणार आहे. त्यातून फार मोठे कारस्थान उघडकीस येईल बघा!...’