Premium|Raja Shivaji film trolling debate : 'राजा शिवाजी' सिनेमा आणि सोशल मीडियावरील ट्रोलधाड; भीती, पीआर आणि कलाविष्काराचा संकोच

Social Media Troll Culture and Art : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला विशिष्ट कप्प्यांत बंद करणाऱ्या ट्रोल संस्कृतीमुळे कलेच्या अभिव्यक्तीवर गदा येत असून, रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने समाजमाध्यमांवरील वाढत्या असहिष्णुतेचा आणि गढूळ वातावरणाचा लेखकाने साकल्याने विचार मांडला आहे.
Raja Shivaji film trolling debate

Raja Shivaji film trolling debate

esakal

Updated on

सुदर्शन चव्हाण- chavan.sudarshan@gmail.com

छत्रपती शिवाजी महाराज हे या राज्याचे, भूमीचे, संस्कृतीचे, भाषेचे प्रमुख प्रतीक आहेत. त्यांच्या आयुष्याचा खूप वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावत अनेक कलाकृती निर्माण होऊ शकतात; पण तशी जागा आजच्या ट्रोलच्या संस्कृतीने आणि त्याहूनही गढूळ झालेल्या राजकीय आणि सांस्कृतिक वातावरणाने खाऊन टाकली आहे.

कलेने अस्वस्थांना धीर द्यावा आणि आत्मसंतुष्टांना अस्वस्थ करावं (Art comforts the disturbed and disturbs the comfortable). सीझर ए क्रुझच्या कवितेतील हे एक गाजलेलं वाक्य; पण आजचा हिंदी सिनेमा, विशेषतः व्यावसायिक सिनेमा बघता आपण या कवितेपासून आज बरेच दूर आलो आहोत याची जाणीव होते. आजचा काळच असा झाला आहे की कोणालाही आपल्या धारणांना, विचारांना धक्का देणारं असं काही बघायचं, वाचायचं नसतं. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा, त्याचा टीजर, त्याचं ट्रोलिंग या निमित्ताने ट्रोल या गोष्टीचा थोडा साकल्याने विचार करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com