

Dealing with Strict Parents Career Expectations
esakal
प्रिय मुला, एक गोष्ट लक्षात ठेव : तुमच्या आई-वडिलांना पटवून देणे, ही एक कला आहे. तुमच्या पालकांना करिअर किंवा निवडीबद्दल पटवून देण्याची घाई करण्यापूर्वी, आधी तुमच्या दृढनिश्चयाची चाचणी घ्या. कठोर परिश्रम केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या खऱ्या आवडीची जाणीव होते. त्याआधी नाही, हे लक्षात ठेवा.
प्रिय मुला,
तुझे आणि तुझ्या आई-वडिलांचे नेहमीच पटेल असे नाही. हे करिअर, जीवनसाथी किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल असू शकते. तुझ्या वडिलांची इच्छा आहे, की तू आयएएस अधिकारी व्हावेस; पण तुला वैज्ञानिक संशोधन करायचे आहे. तुझ्या आईला तुझ्यासाठी एक पारंपरिक गृहिणी शोधायची आहे; पण तू अशा मुलीच्या प्रेमात आहेस जी आपल्या करिअरला महत्त्व देते. हे काही तुमचे अपयश नाही. हे फक्त जीवन आहे; पण एक गोष्ट लक्षात ठेव : तुमच्या आई-वडिलांना पटवून देणे, ही एक कला आहे.
तुझे म्हणणे ऐकले जावे यासाठी भांडण्यापूर्वी प्रामाणिकपणे शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न कर. दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाबद्दल उत्सुक राहा. तू करत असलेल्या प्रत्येक विधानात, तुम्हा दोघांनाही महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींचा विचार असला पाहिजे : सुरक्षितता, आनंद आणि जबाबदारी... जो मुलगा किंवा जी मुलगी संयम राखायला शिकते, त्यांच्यासमोर पालकही मवाळ होतात. खाली जी पुस्तकं सुचवत आहे, ती तुला तिथे पोहोचण्यास मदत करतील.