
किशोर आपटे
धुळ्यात माजी आमदार अनिल गोटे यांनी नाट्यमय पद्धतीने पावणेदोन कोटींची रोख रक्कम पकडून दिली. गोटेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी सुमारे १५ कोटी रुपये या ठिकाणी वाटण्यासाठी आणल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे विधिमंडळाच्या विविध विषयांच्या समित्यांचे कामकाज आणि त्यातील विधिमंडळ सदस्य भ्रष्टाचाराचे आरोप अन् वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.