
डॉ. केशव साठये
पॉडकास्ट, रील, व्हिडिओ या माध्यमांतून आशयनिर्मिती करत केलेली आर्थिक उलाढाल म्हणजेच ‘क्रिएटर इकॉनॉमी’. भारतात नव्वद कोटींहून अधिक इंटरनेट ग्राहक असल्यामुळे या व्यवसायाला अनूकूल वातावरण आहे. सातत्यपूर्ण सर्जनशीलतेतून त्याचा लाभ करून घेता येईल.
पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर महिन्याच्या आपल्या ‘मन की बात’ मध्ये भाषणात डिजिटलविश्वातील एका नव्या पर्वाचा आवर्जून उल्लेख केला तो म्हणजे ‘क्रिएटर इकॉनॉमी’चा. अगदी अलिकडेच अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्डट्रम्प यांनीही आपल्या माध्यमसंपर्क वर्तुळात डिजिटल माध्यमातून समाजावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींना-संस्थांना ‘प्रेस ब्रिफिंग’मध्ये मानाचे स्थान देत या व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. हे तिच्या वाढत्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब केल्यासारखेच आहे.