
कौस्तुभ केळकर
kmkelkar@rediffmail.com
क्रेडिट कार्ड आर्थिक व्यवहारांचे काही मर्यादेत स्वातंत्र्य देणारे उपयुक्त माध्यम आहे. परंतु, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील, तर खर्च वाढू शकतो. आजकाल क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांनी खर्च करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडिट कार्ड बिलाचे ‘ईएमआय’ने पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. परंतु, यासाठी प्रचंड व्याजदर आकारला जातो. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील आणि त्यामधील काही वापरत नसतील, तर यातील एक क्रेडिट कार्ड सोडून सर्व कार्ड रद्द करणे आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे ठरते.