
Criminalization of Politics
esakal
कर्नाटकातील JD(S) पक्षाचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. रेवण्णा प्रकरण हा एक संकेत आहे की भारतीय राजकारणातील निवडक व्यक्तींमध्ये नैतिक अधःपतन किती खोलवर गेले आहे.
नैतिकता आणि राजकारण : तत्त्वज्ञान
राजकीय नेतृत्व हे लोकशाहीचे नैतिक स्तंभ आहे, असे म्हणताना महात्मा गांधी म्हणतात, "राजकारण हे अनैतिक असू शकत नाही." राजकारणातील नैतिकतेच्या अनुषंगाने अरस्तू म्हणतो "राज्य हे नैतिक कल्याणासाठीचे साधन आहे.”
इमॅन्युएल कान्ट यांच्या ''Categorical Imperative'' नुसार, प्रत्येक कृती न्याय्य व सार्वत्रिक नैतिक निकषांवर आधारित असावी. मात्र, आजच्या राजकारणात मूल्याधिष्ठित नेतृत्व दूर गेले आहे.