Premium|Study Room : राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक म्हणजे लोकशाहीला मोठा धोका!

Political reforms and criminal politicians : भारतीय लोकशाहीला लागलेली गुन्हेगारीकरणाची कीड आणि लोकसभेत वाढलेली डागाळलेल्या प्रतिनिधींची संख्या पाहता, निवडणूक सुधारणांसह मतदारांची जागृती आणि राजकीय पक्षांची नैतिकता हाच या समस्येवरील एकमेव प्रभावी उपाय ठरणार आहे हे स्पष्ट दिसते.
Political reforms and criminal politicians

Political reforms and criminal politicians

esakal

Updated on

अभिजित मोदे

भारतातील राजकारणात गुन्हेगारांचा वाढता प्रभाव ही गोष्ट लोकशाहीसाठी मोठा धोका ठरत आहे. हे गुन्हेगारीकरण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून, संपूर्ण समाजाच्या नैतिक मूल्यांवर परिणाम करत आहे.

गुन्हेगारीकरण म्हणजे काय?

राजकारणातील गुन्हेगारीकरण म्हणजे अशा व्यक्तींना राजकीय नेतृत्व मिळणे ज्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. हे लोक पैसा, हिंसा किंवा जाती-धर्माच्या नावाखाली मतदारांना प्रभावित करतात. २०२४ नंतर लोकसभेत गुन्हेगार खासदारांची संख्या ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे कायदेमंडळात गुन्हेगारांचा वावर वाढतो आणि ते असे कायदे बनवतात जे समाजाच्या हिताचे नसतात.

राजकारणात गुन्हेगार वाढण्यामागची कारणमीमांसा

या समस्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. प्रथम, पैशाची मोठमोठी उधळपट्टी. निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च होतात, जे केवळ श्रीमंत किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाच करता येतात. दुसरे, मतदारांची अज्ञानता किंवा भीती. अनेकदा गुन्हेगार नेते स्थानिक पातळीवर विकासाची कामे करून लोकांना फसवतात. तिसरे, राजकीय पक्षांचा हेतू. पक्षांना विजय मिळवायचा असतो, म्हणून ते गुन्हेगारांना तिकीट देतात. वोरा समितीच्या अहवालातही गुन्हेगार आणि राजकारणी यांच्यातील ऋणानुबंध दाखवले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com