
बाळासाहेब पाटील
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात पीकविमा योजना राबविण्यात आली. मात्र, या योजनेतून शेतकऱ्यांऐवजी या कंपन्यांचेच भले झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये या योजनेतून विमा कंपन्यांना तब्बल १६ हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे, ही योजना नेमकी कोणाच्या फायद्याची हा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याच्या अर्थकारणात मोठा वाटा उचलणारे क्षेत्र म्हणून शेतीकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत भरवसा मिळावा, आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी पीक विमा योजना आणली गेली.