

Crypto Investment Tax Explained: 30% Tax, 1% TDS and ITR Filing Guide
E sakal
प्रियांका कुलकर्णी
priyankakulkarni2201@gmail.com
गेल्या काही वर्षांत बिटकॉइन, इथेरियम आदी विविध क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर भारतात विशेष करनियम लागू आहेत. हे नियम शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा वेगळे असल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांकडून चुका होतात आणि पुढे प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच ‘क्रिप्टो’मध्ये व्यवहार करणाऱ्या प्रत्येकाने प्राप्तिकर विवरणपत्र भरताना सर्व बाबींची माहिती घेणे आवश्यक आहे.
बिटकॉइन, इथेरियम आदी विविध क्रिप्टो करन्सीमध्ये काही जण दीर्घकालीन गुंतवणूक करतात, तर काही जण नियमित खरेदी-विक्री करून नफा मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभावर प्राप्तिकर लागू होतो. त्याबाबतचे नियम शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी असलेल्या नियमांपेक्षा वेगळे आहेत, याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे अनेकदा प्राप्तिकर विवरणपत्र भरताना अडचणी येतात. यासाठी क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीबाबत असलेले प्राप्तिकर नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.