
श्याम पेठकर
pethkar.shyamrao@gmail.com
एकुणात शिव्या देता येणे, हीदेखील गुणवत्ता असू शकते. अनेक व्यवसायांत, अगदी खेळातही शिव्या देता यायला हव्या. आता क्रिकेटमध्ये फलंदाजाचे कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी स्लेजिंग म्हणजे चक्क शिवीगाळ केली जाते. कर्जवसुली करणाऱ्यांना समोरच्याचा मनोभंग करून त्याने कर्ज परतफेड करावी, यासाठी योग्य भाषेत त्याला डिवचावे लागते आणि ते डिवचणारे शब्द हे शिव्याच असतात...
आता चातुर्मास सुरू आहे. परतीची वारी सांगता होते आहे म्हणजे, हे ओव्यांचे दिवस असताना एकदम शिव्या आठवण्याचे कारण काय? ...तर नुकताच एका संस्थेने सर्व्हे केला, की देशात कुठले राज्य शिव्यांच्या बाबतीत आघाडीवर आहे.