आर्किटेक्चरची प्रगती नेहमी एका प्रवाहात आणि एका दिशेने झाल्याचं सांगितलं जातं. साध्या गोल घरांपासून हळू हळू कोपऱ्यांच्या घरांपर्यंत. पण अलीकडच्या पुरातत्त्वीय शोधांमुळे हा प्रवास खरंच असा होता का हा प्रश्न पडतो..हिब्रू विद्यापीठाच्या हदास गोल्डगेयर सांगतात, की पुरातत्वशास्त्रज्ञ इमारती किंवा घरांची गुणात्मक भाषेत गोल किंवा चौकोनी या दोनच विभागण्या करून मोकळे होतात. पण आर्किटेक्चरमध्ये या पलीकडे सुद्धा बारकावे बघणं गरजेचं असतं. गोल्डगेयर यांनी या विषयावर एक परिमाणात्मक विश्लेषण केलं.नैऋत्य-आशिया भागात त्यांनी २३ जागांवर सुमारे ११८ इमारतींचा परिमाणात्मक सर्वेक्षण करून अभ्यास केला. या इमारती १० ते १४ हजार वर्ष जुन्या आहेत. त्यात असं लक्षात आलं की सुरुवातीची बांधकामं पूर्ण गोलाकार नव्हती. तर त्यात वेगवेगळ्या आकारांचा समावेश होता. अर्धवर्तुळ, थेंबाच्या आकाराची घरं सुद्धा आढळली. काही ९० अंशी कोपऱ्यांचा देखील समावेश होता. गावं वसवण्याच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा बांधकामासाठी कार्यक्षमतेच्या संकल्पना वापरल्या जात असाव्यात..या शोधामधून १२,००० ते १२,५०० वर्षांपूर्वीच नॅटुफियन लोकांनी कोपरे असलेली घरं बांधलेली असू शकतात असं समोर आलंय. नॅटुफियन लोकं प्रामुख्याने भटकी होती पण त्यांनी कालांतराने घरं बांधणं सुरू केलं. माणसाने आयताकार घरांपूर्वी गोलाकार घरं बांधली असतील या समजुतीवर विश्वास ठेवणं आता अवघड होतंय. आर्कियोलॉजिकल रिसर्च इन एशिया जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, आयताकार किंवा कोपऱ्यांच्या इमारतींची संकल्पना आपल्याला वाटतीये त्याहून २,००० वर्ष आधीपासून अस्तित्वात असल्याचं समोर आलंय..नोट्र डेम विद्यापीठातील इयान क्वीट यांच्या मते, कोपरे आणि समांतर रचना यांचे दैनंदिन आयुष्यातील फायदे स्पष्ट आहेत. आयताकार घरं बांधणं आणि त्यांचे इतर आराखडे मांडणं जास्त सोप्पं असतं. दोन घरांमध्ये एक भिंत वाटून घेता येते. साहित्य आणि संसाधनं कमी लागतात. नॅटुफियन लोकांना कोपऱ्यांची संकल्पना माहीत होती, ते त्याचे फायदे जाणून होते पण त्यांनी त्यांच्या वास्तू पूर्णपणे आयताकार बांधल्या नाहीत. ही लोकं कोपरे, कोन आणि आयताकाराचे फायदे जाणून असले तरीही त्यांनी त्या गोष्टीचा पुरेपूर वापर केलेला दिसत नाही.आयुष्य सोप्पं व्हावं ही संकल्पना आजच्या आधुनिक वास्तुरचनेत प्रखरपणे दिसून येते. सध्या मिनिमलिझमची (लघुरचनावाद) लाट आहे—स्वच्छ, सरळ रेषा, कमीत कमी डिझाईन, अनावश्यक सजावट टाळून केवळ आवश्यक घटकांवर भर. या मिनिमलिस्ट संकल्पनेचा मूळ गाभा नॅटुफियन वास्तूंसारखाच आहे—कोपऱ्यांमुळे अधिक सोपे आणि प्रभावी वास्तुशिल्प!.Premium| Malvan Marine Sanctuary: सागरी जैवविविधतेचा अद्भुत खजिना!.मात्र, या मिनिमलिस्ट प्रवासात सौंदर्य आणि बारकावे हरवत चालले आहेत. पूर्वीच्या इमारतींमध्ये कोरीव नक्षीकाम, भव्य सजावट आणि समृद्ध वास्तुशास्त्र असायचे. आज शहरी भागांतील अनेक नवीन वास्तू साध्या, वैशिष्ट्यहीन आणि एकसारख्या दिसतात. पूर्वी शिल्पकलेच्या भव्यतेला आणि दगडांमधून व्यक्त होणाऱ्या कहाण्यांना आता खर्च, गरज आणि कार्यक्षमतेच्या नावाखाली बळी द्यावा लागतोय.नॅटुफियन वास्तूंमध्ला कोपऱ्यांचा वापर जागेच्या पुरेपूर वापरासाठी एक महत्त्वाचे पाऊल होते. मात्र, त्याकाळी त्यांच्या घरांची रचना त्यांच्या गरजा, कला आणि निसर्गाभोवती फिरायची. गोलसर, नैसर्गिक आकारांपासून कोपऱ्यांपर्यंत आणि आता लघुरचनावादी संकल्पनेच्या दिशेने झालेला बदल माणसाच्या आयुष्यात बदलणाऱ्या प्राधान्याकडे लक्ष केंद्रित करतो. वास्तुकलेचा हा प्रवास केवळ तंत्रज्ञानाचा नव्हे, तर आपल्या जगाशी असलेल्या नात्याचाही आहे..Premium|First Marathi Cinemascope Film: मराठीत पहिल्यांदा सिनेमास्कोप .कोपऱ्यांचं अस्तित्व खूप पूर्वीपासूनचं असल्याच्या या शोधामुळे एक गोष्ट स्पष्ट होते— नवकल्पना नेहमीच सरळरेषेत घडत नाहीत. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्याने विचार करण्याची आणि पारंपरिक समजुतींना प्रश्न विचारण्याची गरज असते. आज आपण मिनिमलिस्ट युगात प्रवेश करत असताना, नॅटुफियन संस्कृतीकडून फक्त कोपऱ्यांची कार्यक्षमता नाही, तर जागेबद्दलची भावना, सौंदर्य आणि बारकावे यांचा समतोल कसा राखता येईल, हेही शिकायला हवं..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.