Premium I Raja Ravi Varma Krishna Yashoda painting : केवळ ७ मिनिटांत पार पडला १६७ कोटींचा व्यवहार! राजा रविवर्मांच्या चित्रासाठी पुनावालांनी का मोजली एवढी मोठी किंमत?

Indian Art Auction : जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि तेलाच्या राजकारणात भारताची मोठी चर्चा सुरू असतानाच, डॉ. सायरस पुनावाला यांनी राजा रविवर्मा यांचे 'कृष्ण यशोदा' पेंटिंग १६७ कोटींना खरेदी करून कलाविश्वात नवा इतिहास रचला असून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Raja Ravi Varma Krishna Yashoda painting

Raja Ravi Varma Krishna Yashoda painting

esakal

Updated on

मोबाईल, टीव्ही आणि इतर समाजमाध्यमांवर सध्या इस्राईल-अमेरिका विरुद्ध इराणचा रणसंग्राम जोरात सुरू आहे. त्यात आखाती देशासोबतच भारतही भरडला जात आहे. रशिया, चीन, दक्षिण कोरिया इत्यादी देश इराणच्या मागे भक्कमपणे उभे आहेत, तर नाटो देश या युद्धामुळे नाखूश आहेत. स्पेन आणि इटलीने तर अमेरिकेसोबत जाण्यास साफ नकार दिला आहे. अख्ख्या जगाला माहीत आहे, की हे युद्ध फक्त आणि फक्त तेलसाठ्याच्या मालकी हक्कासाठी होत आहे अन् त्यात जागतिक वर्चस्व निर्माण करण्याच्या चढाओढीकडे जगाचे लक्ष लागून आहे... अशा प्रकारे रोज-रोज युद्धाच्याच बातम्या कानावर पडत असताना अचानक एक घटना अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेते ती म्हणजे, ‘राजा रविवर्मा’ नावाच्या एका महान भारतीय चित्रकाराचे ‘कृष्ण यशोदा’ नावाचे पेंटिंग सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सॉयरस पुनावाला तब्बल १६७.२० कोटी एवढ्या प्रचंड किमतीला विकत घेतात... मुंबईतील एक आर्ट डीलर कंपनी, सॅफ्रॉन स्प्रिंग लाइव्ह ऑक्शनतर्फे हा व्यवहार पार पडला... खरेच ही घटना अचंबित करणारी आहे आणि आशादायकही...

‘कृष्ण यशोदा’च्या पेंटिंगबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे १८९० मध्ये राजा रविवर्मा यांनी ते तयार केले. त्यात माता यशोदा गाईचे दूध काढत असताना कृष्ण तिच्या पाठी उभा आहे अन् अत्यंत प्रेमाने हास्य करताना दिसत आहे. भारतीय कला खजिन्यातील ते एक महत्त्वाचे पेंटिंग होते. खरे म्हणजे या चित्रासाठी सॅफ्रॉनद्वारे ८० ते १२० कोटी एवढी किंमत गृहीत धरली गेली होती, परंतु लिलावात त्याला तब्बल १६७.२० कोटी रुपये मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com