
डॉ. अनंत सरदेशमुख, माजी महासंचालक, सदस्य, कार्यकारी समिती, मराठा चेंबर, कंपनी संचालक, व्यवस्थापन स्टार्टअप मार्गदर्शक
स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये नुकतीच ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ची परिषद झाली. या परिषदेमध्ये अनेक देशांच्या प्रमुखांसह आघाडीच्या जागतिक कंपन्याही सहभागी होत असतात. या परिषदेमध्ये महाराष्ट्रात विक्रमी १६ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे करार झाले. यामध्ये भारतातील कंपन्या बहुतांश आहेत. त्यामुळे, दावोस परिषद म्हणजे नेमकी काय, हे समजावून घेणे गरजेचे आहे.