चकोर गांधी( chakorgandhi@gmail.com )
कोणत्याही व्यवसायामध्ये स्टॉक म्हणजे मालाचा साठा हा लागतोच. बॅलन्सशीटमध्ये तो करंट ॲसेटमध्ये दिसतो. तो योग्य रीतीने ठेवल्यास व्यवसाय व्यवस्थित होतो. स्टॉक कमी असल्यास व्यवसायावर परिणाम होतो व अधिक असल्यास विनाकारण त्यात पैसे अडकतात. यासाठी स्टॉकचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. उत्तम व्यापाराचा हा एक महत्त्वाचा फंडा आहे.
मॅन्युफॅक्चरिंग अर्थात उत्पादनक्षेत्रात कच्चा माल, वर्क इन प्रोग्रेस आणि तयार माल असे मिळून स्टॉक समजला जातो. त्यालाच इन्व्हेंटरी असेही म्हटले जाते. कारखानदारीत योग्य कच्चा माल, प्रोसेसप्रमाणे योग्य वर्किंग प्रोग्रेस व बाजारातील मागणीप्रमाणे तयार माल नियंत्रित करावा लागतो. सिझनल व्यवसायाचे उदाहरण बघितले, तर छत्र्या, वह्या, फटाके यामध्ये वर्षभर सर्व स्टॉक ठेवून ठरावीक सीझनमध्येच तो विकावा लागतो. त्यामुळे वर्षभर कच्चा माल, वर्किंग प्रोग्रेस व तयार माल सांभाळावा लागतो.