

Municipal Corporation Elections Maharashtra
esakal
दीर्घ काळाच्या प्रशासकीय राजवटीनंतर राज्यातील २९ महापालिकांमध्ये निवडणुका होत आहेत. राज्यात दीर्घकाळ प्रशासकराज राहणे हे लोकशाहीवर झालेले गंभीर आघात आहेत. हा पायंडा पुढे चालू राहिल्यास, भविष्यात राज्य किंवा केंद्र सरकारच्या पातळीवरही असेच घडू शकते आणि देशातील लोकशाही धोक्यात येऊ शकते, याची जाणीव जनतेने ठेवणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी का हवेत आणि प्रशासकांच्या राजवटीत काय व्हायला हवे होते याचा वेध.
भारतीय राज्यघटनेत लोकशाही प्रणाली ही शासनव्यवस्थेचा गाभा मानली असून, ती प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा त्रिस्तरीय शासनरचनेची तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः नागरिकांचे दैनंदिन आणि स्थानिक स्वरूपाचे प्रश्न त्यांना जवळच सोडवता यावेत, या उद्देशाने राज्यघटनेत ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे.