
सुनील चावके
पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ होऊ न देता शेवटपर्यंत सत्ता शाबूत ठेवण्यासाठी केजरीवाल यांना आजवरचा राजकीय अनुभव पणाला लावावा लागणार आहे. दिल्लीच्या निकालानंतर केजरीवाल शांत आहेत, याचा अर्थ त्यांच्या मनात काही तरी शिजत असावे, या शंकेने दिल्लीतील भाजप आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत.