
सुनील चावके, नवी दिल्ली
एखादे उत्तम स्थितीतीत प्रवासी विमान आकाशात २५ ते ३० वर्षे उडू शकते. पण तितक्याच उत्तम अवस्थेतील वाहन रस्त्यावर पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ धावू शकत नाही. तूर्तास राजधानी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरासाठी हा दंडक सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिलेल्या निकालाने घालून दिला आहे.
या आदेशामुळे यंदा जूनअखेर दिल्लीतील १८ लाख चारचाकी आणि ४४ लाख दुचाकी वाहने अपमृत्यूस पात्र ठरली आहेत. वायू प्रद्रूषणाचा प्रश्न दिल्लीच्या पाचवीला पूजलेला आहे. हवेच्या प्रदूषणासाठी अनेक कारणे आहेत.