Premium|Ancient Indian Civilization Architecture : धोलावीरा: हडप्पाकालीन नगररचनेचे अद्वितीय दर्शन

Dholavira UNESCO World Heritage Site : कच्छच्या रणातील धोलावीराची प्रगत जलव्यवस्थापन प्रणाली आणि कर्नाटकातील होयसळ मंदिरांचे अचाट पाषाण कोरीवकाम भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ दर्शवत असून, या जागतिक वारसा स्थळांची संपूर्ण माहिती देणारा हा विशेष लेख पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारा ठरेल.
Ancient Indian Civilization Architecture

Ancient Indian Civilization Architecture

esakal

Updated on

वरूण परब

धोलावीरा

  • हडप्पाकालीन शहर

  • जवळचे शहर : भूज

  • जवळचे विमानतळ : श्यामजी कृष्ण वर्मा

  • विमानतळ, भूज जवळचे रेल्वेस्थानक : भूज

  • केव्हा जाल? : नोव्हेंबर ते फेब्रुवारी

वारसास्थळाची वैशिष्ट्ये : भूज शहरापासून १२० किलोमीटर अंतरावर असणारे हे सहावे सर्वात मोठे हडप्पाकालीन शहर. या ठिकाणी इ.स.पू. ३००० ते १५०० शतकापर्यंत मानवी वस्ती होती. या शहरामुळे हडप्पाकालीन नगररचना, बांधकाम तंत्र, जलव्यवस्थापन, सामाजिक प्रशासन, कला, उत्पादन, व्यापार आणि श्रद्धा प्रणाली यांमधील बहुआयामी कामगिरीचे दर्शन घडते. या ऐतिहासिक स्थळाचे दोन मुख्य भाग आहेत, एक तटबंदी असलेले शहर आणि दुसरा भाग म्हणजे शहराच्या पश्चिमेकडील स्मशानभूमी. तटबंदी असलेल्या शहरामध्ये एक किल्ला, उत्सवाचे मैदान आणि तटबंदी असलेले मुख्य शहर व छोटे शहर यांचा समावेश आहे. इथल्या स्मशानभूमीत दफन केलेली बहुतांश पार्थिवे स्मारकाच्या स्वरूपात आहेत. दुरून पाहता हा भाग इथल्या टेकडीवर गढीसदृश दिसतो. धोलावीरा हे शहर विविध खनिजे आणि तांबे, शंख, स्टीटाइट, शिसे, चुनखडी इत्यादी कच्चा माल मिळवण्यासाठी आणि ‘मगन’ (आधुनिक ओमान द्वीपकल्प) व मेसोपोटेमिया प्रदेशांशी अंतर्गत आणि बाह्य व्यापार सुलभ करण्यासाठी प्रसिद्ध होते. धोलावीरा या प्राचीन हडप्पाकालीन शहराचा शोध १९६८मध्ये लागला. १९८९ ते २००५दरम्यान १३ टप्प्यांत भारतीय पुरातत्त्व विभागाने इथे उत्खनन करण्यात केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com