
आयुष्य म्हटलं की अनिश्चितता आलीच! कधी काय होईल, सांगता येत नाही. पण या अनिश्चिततेतही आपण आपल्या जवळच्यांसाठी काहीतरी निश्चित करून ठेवू शकतो. आणि इथेच जीवन विमा म्हणजे Life Insurance आपल्या मदतीला येतो. जीवन विमा म्हणजे तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला मिळणारा आर्थिक आधार, जो त्यांना कठीण काळात मोठा दिलासा देतो.
पण जीवन विमा निवडताना अनेकदा गोंधळ होतो तो यातल्या दोन मुख्य प्रकारांमुळे. पहिला मुदत विमा, म्हणजे Term Life Insurance आणि दुसरा आयुष्यभरासाठीचा विमा, म्हणजे Whole Life Insurance. हे दोन्ही प्रकार काय आहेत आणि तुमच्यासाठी कोणता उत्तम आहे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग, या दोन्ही पर्यायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया 'सकाळ प्लस'च्या या विशेष लेखातून...