From Dopamine to Doomscrolling: The Hidden Cost of Social Media
E sakal
Premium|Digital Safety : लक्ष विचलित करण्यासाठीच समाजमाध्यमं विकसित केली आहेत का?
In an era driven by algorithms and endless scrolling, this article explores how digital platforms are reshaping our attention, influencing our dopamine-driven behaviors, and turning human focus into a powerful economic commodity.
विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृतीचे अभ्यासक
अमेरिकेत एक ऐतिहासिक खटला सुरू आहे. ‘मेटा’चे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांची त्यात नुकतीच साक्ष झाली. एका तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा खटला भरण्यात आला. मेटा आणि युट्यूबने त्यांच्या वापराचे व्यसन लागावे, अशी रचना त्यांच्या मूळ व्यवस्थेतच केली असल्याचा या तरुणीचा आरोप आहे.
लहानपणीच लागलेल्या या व्यसनामुळे आता आपल्याला नैराश्य आले असल्याची तिची तक्रार आहे. खटला जरी तिचा असला तरी तिच्यासारख्या किंवा त्याहून गंभीर तक्रार असणाऱ्या हजारोंचे या खटल्याकडे डोळे लागले आहेत.
खटल्याचा निकाल लागायचा तो लागेल. पण त्यानिमित्ताने डिजिटल माध्यमांशी संबंधित अतिशय महत्त्वाचा मुद्दा न्यायालयीन चर्चेच्या परिघात येत आहे. तो म्हणजे आपले लक्ष आपल्या ताब्यात ठेवण्याच्या अधिकाराचा. लक्ष देणे किंवा अवधान देणे ही एक अत्यंत महत्त्वाची अशी शारीरिक व मानसिक कृती आहे.
आजूबाजूला असलेल्या गोष्टींपैकी किंवा विचारांच्या शक्यतांपैकी एकाचीच मानसिक पातळीवर स्पष्ट निवड करून त्यावर काम करणे ही लक्ष देण्याची एक मानसशास्त्रीय व्याख्या.

