

Philosophy of Mind vs Body in Digital Age
esakal
आपले अनुभव, विचार, कृती, व्यवहार यांचे शरीर हे मूळ अधिष्ठान असते, असे आपल्या कुठेतरी खोलवर मानत असतो. पण आजचे डिजिटल पर्यावरण आपल्या या गृहितकाबाबतच संदेह निर्माण करीत आहे.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे शरीर आणि शारीर अनुभवांपुढे जी आव्हाने निर्माण होत आहेत त्यांचा आढावा घेणे हे या सदराचे मध्यवर्ती सूत्र. आपले अनुभव, विचार, कृती, व्यवहार यांचे शरीर हे मूळ अधिष्ठान असते, असे आपल्या कुठेतरी खोलवर मानत असतो. पण आजचे डिजिटल पर्यावरण आपल्या या गृहितकाबाबतच संदेह निर्माण करीत आहे. त्याचे स्वरूप नवे असले तरी देहाबद्दलचा मूळ संदेह काही नवा नाही. त्याला प्रदीर्घ आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. कधी तो धार्मिक धारणांमध्ये दिसतो, तर कधी तात्त्विक चिंतनांमध्ये. कधी आत्मा, मन, विचार अशा गुंतवळ्यातून त्याच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात, तर कधी आजच्यासारखे तत्त्वज्ञान- तंत्रज्ञानातून. हा संदेह जसा आपल्याकडच्या चिंतनामध्ये दिसतो तसा पाश्चात्य विचारांमध्येही.