Premium|digital media new consciousness : एका शरीराचा आधार, दुजा तंत्रात तर्र..

impact of digital media on human perception and mobility : डिजिटल माध्यमव्यवस्थेने मानवी अनुभव आणि मानसिकतेत नवा टप्पा निर्माण केला आहे. ‘आत्ता आणि इथे’च्या चौकटीत बंद असलेले शरीर आता ‘आत्ता आणि तिथे’च्या डिजिटल अनुभवविश्वातून जीवन अनुभवते. नवभटकेपणाचे मानसिक परिवर्तन व्यापक होत आहे.
impact of digital media on human perception and mobility

impact of digital media on human perception and mobility

esakal

Updated on

विश्राम ढोले- माध्यम, तंत्रज्ञान व संस्कृतीचे अभ्यासक

इतिहास समजून घेण्यासाठी आपण अनेकदा इतिहासाचे काहीएक निकषांवर टप्पे पाडतो. कॅनेडियन माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅकल्युहन यांनी मानवी इतिहासाचे असे टप्पे पाडताना माध्यमांचा निकष वापरला. अर्थात्, इथे त्यांना माध्यमांमध्ये काय सांगितले जाते, हा मुद्दा अभिप्रेत नव्हता. माध्यमांमुळे शरीरातील ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेचा विस्तार होतो आणि त्यामुळे माध्यमव्यवस्था बदलली की सर्वसाधारण मानवी मानसिकता बदलते, हे त्यांच्या मांडणीचे मध्यवर्ती सूत्र. त्याच्याआधारे त्यांनी मानवी इतिहासाचे आदिवासी, साक्षर आणि नवआदिवासी मानसिकता असे तीन टप्पे पाडले. मागील लेखामध्ये या टप्प्यांचे वर्णन आले आहे. पण मॅकल्युहन यांच्या मृत्यूनंतर म्हणजे १९८० नंतर संगणक, इंटरनेट आणि मोबाईल या तीन तंत्रज्ञानांच्या एकत्रिकरणामुळे एक नवी ‘डिजिटल माध्यमव्यवस्था’ प्रस्थापित होत गेली. तिने आपल्या ज्ञानेंद्रियांचा अनेक परीने विस्तार केला. नव्या संवादशक्यता निर्माण केल्या. त्यामुळे आता नवी मानसिकता आणि अर्थातच इतिहासाचा एक नवा टप्पा साकारत आहे. मॅकल्युहन यांच्या पश्चात त्यांचा तर्क पुढे न्यायचा तर याला नवभटक्या मानसिकतेचा टप्पा म्हणता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com