

Digital age problems
esakal
पर्यटनाचा अनुभव हा काया-वाचा-मने ‘सेटल’ होण्याच्या आधीच वाफ होऊन डिजिटल वातावरणात लुप्त होतो. अनेक अनुभवांची अशी डिजिटल वाफ होण्याच्या काळात आपण सध्या वावरतो आहोत.
हा अनुभव तसा बऱ्यापैकी सार्वत्रिक झाला आहे. म्हणजे आपण एखाद्या पर्यटनस्थळी जातो. पण तिथलं सौंदर्य पहिले डोळ्यात आणि नंतर मनात साठवून घेण्यापेक्षा आपण भराभर फोटो काढत सुटतो. तिथून निघताना आपले पाहणे डोळ्यांनी कमी आणि कॅमेऱ्याच्या लेन्समधून जास्त झालेले असते. लेन्स किंवा स्क्रीनमधून पाहण्याच्या नादात तो अनुभव सर्वांगाने घेण्याचे बहुधा राहून गेले असते. अमेरिकी लेखिका सुझन सोनटॅग त्यांच्या ‘ऑन फोटोग्राफी’ या पुस्तकात एक फार मार्मिक विधान करतात. त्या म्हणतात, “फोटो काढणे म्हणजे घेतलेल्या अनुभवाला जणू प्रमाणपत्र देणे. पण अनुभवाला असे प्रेक्षणीयतेपुरता मर्यादित करून आणि स्मरणिकेत रुपांतरित करून फोटोग्राफी ‘अनुभवणे’ एका पातळीवर नाकारतेदेखील.