Premium|25 Years of Dil Chahta Hai : मैत्रीची नवी व्याख्या, दिल चाहता है...

25 Years of Dil Chahta Hai : ‘दिल चाहता है’ला २५ वर्षे पूर्ण होत असताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी पूजाच्या भूमिकेच्या आठवणी सांगितल्या. फरहान अख्तरच्या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटाच्या अनुभवांना त्यांनी उजाळा दिला.
25 Years of Dil Chahta Hai

25 Years of Dil Chahta Hai

esakal

Updated on

फरहान अख्तरला अभिनय आणि गायनामध्ये आयुष्य एक्सप्लोअर करावंसं वाटत असेल, तर त्याची चाहती आणि त्याच्या हाताखाली काम केलेली त्याची ‘पूजा’ म्हणून मी नक्कीच म्हणेन, की त्याने ते नक्की करावं. कारण शेवटी तो ‘दिल चाहता है’सारख्या अजरामर चित्रपटाचा दिग्दर्शक आहे!

तरुणाईच्या मनाचा ठाव घेणारा अन् मैत्रीची अनोखी व्याख्या सांगणारा ‘दिल चाहता है’ चित्रपट नुकताच २५ वर्षांचा झाला. त्यातील आकाश, समीर आणि सिद्धार्थ आपल्यातलेच एक वाटले. त्यांची घट्ट मैत्री, प्रेम अन् दुराव्याचे आपण साक्षीदार झालो. त्यातूनच शिकलो आयुष्यातील संघर्षाला कसं सामोरं जायचं ते. सिनेमात एक मराठी मुलगी होती, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. जिने ‘पूजा’ साकारली होती. आज तीच पूजा अजरामर अशा ‘दिल चाहता है’च्या पडद्यामागच्या खास आठवणींना उजाळा देत आहे...

‘दिल चाहता है’ चित्रपटाला २५ वर्षं पूर्ण झाली...! एवढी वर्षं कशी गेली कळलंच नाही. फरहान अख्तर पहिल्यांदाच दिग्दर्शन करीत होता. झोया अख्तर कास्टिंग डायरेक्टर होती. तिनेच माझी सिनेमासाठी निवड केली होती. ‘दिल चाहता है’मधील पूजाच्या भूमिकेच्या ऑडिशनसाठी मी तिला भेटले, तेव्हाच मला जाणवलं, की या टीमसोबत काम करायला हवं. कारण सगळीच मंडळी अत्यंत उत्साही आणि तरुण होती. ऑडिशनच्या वेळचा सीन करतानाच खूप मजा आली. खरं सांगायचं तर ‘काय मस्त मंडळी आहेत ही’ असा फील मला तेव्हाच आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com