

Dinanath Gurudev
esakal
नगुबाईंचे गाणे ऐकून दीनानाथ गुरुजींच्या घरी पोहचले, निसर्गाचे अद्भुत रूप त्यांना मोहित करत होते, त्यामुळे त्यांना गुरुगृही पोचायला उशीर झाला. प्रसाद न देणाऱ्या देवळातल्या महाराजांमुळे दीनानाथ यांच्यावर वेगळाच प्रसंग ओढवला. मास्टर दीनानाथ यांच्या आयुष्यातला वेदनादायी कालखंड सांगत आहेत हृदयनाथ. जो त्यांना सांगितलाय स्वतः दीदींनी.
गोमांतक प्रांतातल्या सर्व आगळ्या वेगळ्या
जातींच्या फुलांनी गुरुजींच्या घराचे
प्रांगण सजले होते.
फुलझाडांनी सजलेले बरेच मोठे आवार
आणि त्या आवारामधोमध गुरुजींचे घर,
बैठकीची खोली, रियाजाची, मुलांना गाणं
शिकवियाची खोली. बाजूला स्वयंपाकघर,
देवघराची खोली आणि मागे मोठे परस.
रियाजाच्या खोलीत दोन तानपुरे. एक सुबक
सूरपेटी, तबल्याची जोडी. खाली सतरंजी,
आणि सतरंजीवर गादी, लोड, सारे साधे,
सुबक, सुंदर, स्वच्छ, नीट लावलेले.
घराच्या दारावर एक सुंदर जाईजुईची वेल
सोडलेली, फुलांनी गच्च झालेली.
वेगवेगळ्या फुलांचे गंध. त्यात जाईजुईचा
सुगंध मिसळून निर्माण झालेला परिमळ,
साऱ्या अंगणाला, घराला वेढून होता.
त्या वेढलेल्या झुळकलेल्या परिमळातून
एक सुगंधित झालेली आलापी ऐकू आली.
सुस्वर चढ्या सुराचा आवाज, फिरणारा,
गायकीचा रियाज केलेला, किंचित