Premium|DNA Discovery : डीएनएचा अद्‍भुत प्रवास; चार रासायनिक अक्षरांनी घडवलेली वैद्यकीय क्रांती

DNA Medical Applications : डीएनएच्या शोधाने वैद्यकशास्त्राचा चेहरामोहरा बदलला. आनुवंशिक आजार, कर्करोगाचा धोका, गर्भधारणेतील तपासणी आणि वैयक्तिक उपचारांपासून गुन्हे तपासापर्यंत डीएनए महत्त्वाचा ठरतो.
DNA Medical Applications

DNA Medical Applications

esakal

Updated on

डॉ. दिलीप निकम - sakal.avtaran@gmail.com

डीएनएच्या शोधाने मानवी शरीर, आजार आणि उपचारांकडे पाहण्याची वैद्यकशास्त्राची दृष्टीच बदलून टाकली. चार रासायनिक अक्षरांमध्ये दडलेली जीवनाची माहिती आज कर्करोगाचे निदान, आनुवंशिक आजारांची जोखीम आणि वैयक्तिकृत उपचारांचा मार्ग दाखवत आहे. जीवनाचे गुपित उलगडण्यापासून भविष्यातील वैयक्तिक उपचारांपर्यंतचा प्रवास विलक्षण आहे.

अलीकडेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, दिल्लीतील एक जोडपे मूल होत नाही म्हणून कृत्रिम गर्भधारणा (आयव्हीएफ) करून घेते आणि जानेवारी महिन्यात दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म देते... परंतु सहा महिन्यांनंतर मुलींची वाढ होताना त्यांचे चेहरे आई-वडिलांसारखे दिसत नसल्याचे लक्षात आल्याने ते डीएनए चाचणी करून पाहतात. चाचणीमध्ये दोन्ही मुलींचे डीएनए आई-वडिलांपेक्षा वेगळे असल्याचे लक्षात आल्यावर मात्र ते जोडपे न्यायालयात धाव घेते... एखाद्या गुन्ह्याचा तपास असो किंवा आज एखाद्या व्यक्तीला कर्करोग होण्याची आनुवंशिक शक्यता आहे का, एखादे मूल जन्मजात आजार घेऊन जन्माला येण्याचा धोका किती आहे किंवा कोणते औषध एखाद्या रुग्णासाठी अधिक परिणामकारक ठरेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधताना आधुनिक वैद्यकशास्त्र डीएनएकडे पाहते; पण अवघ्या दीडशे वर्षांपूर्वी अशा डीएनएविषयी आपल्याला जवळजवळ काहीच माहिती नव्हती. डीएनएच्या शोधाची कहाणी म्हणजे मानवी शरीरातील सर्वांत सूक्ष्म गोष्टीचा शोध घेत विज्ञानाने वैद्यकशास्त्रात घडवलेल्या क्रांतीची गाथा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com