
खरंतर मांजरी सुद्धा कुत्र्यांसारख्या हुशार असतात. त्यांनाही बऱ्याच गोष्टी कळतात, पण त्या ते इतरांना कळू देत नाहीत. आणि यामुळे त्यांचा स्वभाव नीट कळत नाही. मग त्यांच्यावर प्रयोगात्मक अभ्यास करता येत नाही. पण नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असं समोर आलंय की मांजरींना त्यांच्या मालकाचा वास व्यवस्थित ओळखता येतो. हे संशोधन एकूण 30 मांजरींच्या मदतीने केलं गेलंय. आता नेमकं काय पाहिलं गेलं, कसं शोधलं गेलं आणि मुळात ‘स्वार्थी’ प्रवृत्तीच्या आणि अत्यंत अंतर्मुख स्वभाव असलेल्या मांजरींना या लोकांनी कसं बरं संशोधनाचा भाग बनवलं ते वाचा ‘सकाळ प्लस’च्या या लेखात...