spirituality benefits
Esakal
पुणे - If you just sit and observe, you will see how restless your mind is. If you try to calm it, it only makes it worse, but over time it does calm down, and when it does, there's room to hear more subtle things, that's when your intuition starts to blossom and you see things more clearly and be in the present more.
हे प्रसिद्ध वाक्य आहे Apple च्या निर्मितीचे प्रमुख स्टीव जॉब्स यांचे.. ते म्हणतात की, जर तुम्ही शांतपणे बसून निरीक्षण केलं, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं मन किती अस्वस्थ आहे. पण हळूहळू ते शांत होतं आणि जेव्हा मन शांत होतं, तेव्हा सूक्ष्म गोष्टी ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता निर्माण होते.
स्टीव्ह जॉब्स जेव्हा महाविद्यालयात शिकत होते, तेव्हा आर्थिक अडचण आणि मानसिक अस्वस्थतेमुळे त्यांनी कॉलेज सोडलं. त्यांच्या मनात आयुष्याचे खरे ध्येय काय? आणि मला नक्की काय करायचं आहे? याबद्दल प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. हा त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा मानसिक संकटकाळ होता. या काळात त्यांनी भारतात येऊन अध्यात्मात काही काळ घालवला आणि त्यानंतरची त्यांची प्रगती आपण जाणतोच.
देव, श्रद्धा याविषयी आपल्या अनेकांमध्ये मतमतांतरे असली तरी संकटकाळात आजही अनेकांना अध्यात्म हे मोठा आधार देतं. अनेकांच्या मते अध्यात्म हे त्यांना त्यांच्या मूळ हेतूकडे घेऊन जातं.. पण असं काहींच मत जरी असलं तरी प्रत्यक्षात विज्ञान काय सांगतं? खरोखरच अध्यात्माकडे वळल्याने माणूस शांत होतो, त्याला त्याचं साध्य सापडतं, तो संकटातून योग्य प्रकारे बाहेर पडायला याची मदत होते की या फक्त समजुती आहेत? मुळातून यावर काही शास्त्रीय अभ्यास झालेत का..? या अभ्यासातून कोणते निष्कर्ष मांडण्यात आले आहेत? हे सगळं आपण जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखातून..