
सुनील चावके
भाजप आणि काँग्रेसचे समर्थक आणि प्रवक्तेही अतिशय घाईघाईने प्रतिक्रिया व्यक्त करतात. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाचा भाग असलेल्या वादात भाजप आणि काँग्रेसने उड्या घेण्यापूर्वी ट्रम्प आणि इलॉन मस्क यांनी केलेल्या आरोपांची आपापल्या परीने शहानिशा करणे गरजेचे होते. कुठल्याही, अगदी अंगलट येणाऱ्या मुद्यांवर आक्रमक प्रतिक्रिया देऊन विरोधकांवर क्षणिक कुरघोडी करण्याचा उतावळेपणा भाजप आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाला आणि राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या अंगवळणी पडला आहे.