
शहाजी मोरे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे विज्ञानक्षेत्राच्या प्रगतीलाच खीळ बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. ट्रम्प आणि त्यांच्या मर्जीतील उद्योगपतींना गुंतवणुकीतून तत्काळ आणि प्रचंड परतावा हवा आहे; परंतु विज्ञान संशोधनातील गुंतवणूक दीर्घकालीन हिताची असते.
वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान-तंत्रज्ञान यांचे देशाच्या विकासासाठी असलेले महत्त्व याची जाण व ट्रम्प यांचा सुतराम संबंध नसल्यामुळे किंवा त्यांना त्याची व फिकीर नसल्यामुळे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असे म्हणत ते निवडून आले; परंतु त्यांची धोरणे अमेरिकेला व अमेरिकेतील विज्ञानाला घातक ठरत आहेत. यामध्ये फक्त अमेरिकेचे नव्हे तर जगाचे नुकसान आहे.