Premium|Study Room : जिल्हा प्रशिक्षण अधिकारी पदावर असताना आपल्याच कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकांविषयी काय भूमिका घ्याल?

Fire safety training mishap : अग्निसुरक्षा प्रशिक्षणातच निष्काळजीपणामुळे भीषण अपघात; कमी खर्चाला प्राधान्य, जोखीम आढाव्याचा अभाव आणि उपकरणांची देखभाल न केल्याने प्रशिक्षणार्थी जखमी, जबाबदारी टाळण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह
Fire safety training mishap

Fire safety training mishap

esakal

Updated on: 

तुम्ही जिल्हा प्रशिक्षण आणि विकास अधिकारी (DTDO) आहात आणि तुम्ही एका शासकीय प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख आहात. १२० प्रशिक्षणार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन व अग्निसुरक्षा यावरील आठवडाभराचा परिचय-प्रशिक्षण (induction) सुरू आहे. संध्याकाळी अग्निशामन (फायर-फायटिंग) प्रात्यक्षिकासाठी घेतलेल्या बाह्य (आउटसोर्स) एजन्सीने केलेल्या कार्यक्रमात योग्य गर्दी नियंत्रण न ठेवणे आणि ज्वलनशील पदार्थांचा निष्काळजी वापर झाल्यामुळे आग लागते. शामीआना (तंबू) पेटतो; अनेक प्रशिक्षणार्थी जखमी होतात, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आणि एकाची प्रकृती अतिगंभीर आहे.

चौकशीत पुढील बाबी समोर येतात

  • एजन्सीची निवड प्रामुख्याने सर्वात कमी खर्च (lowest cost) यावर केली गेली; याआधी काही अनौपचारिक तक्रारी आल्या होत्या, तरी त्याकडे दुर्लक्ष झाले.

  • कोणताही पूर्वजोखीम आढावा (risk assessment) किंवा मॉक ड्रिल झाली नव्हती.

  • अग्निशामक यंत्रे (fire extinguishers) वेळेवर सर्व्हिस केलेली नव्हती; काही कामच करीत नव्हती.

  • काही कर्मचाऱ्यांनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातीला प्रशिक्षणार्थ्यांना घटना रेकॉर्ड करण्यास किंवा माध्यमांशी बोलण्यास मज्जाव केला.

  • माध्यमे गंभीर/फौजदारी निष्काळजीपणा असे आरोप करीत आहेत.

  • जखमींच्या कुटुंबीयांकडून कडक कारवाई, भरपाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

  • राजकीय नेतृत्वाकडून अनौपचारिक सल्ला येतो की, “वाद वाढवू नका, जास्त चर्चा टाळा आणि सगळी जबाबदारी एजन्सीवर ढकला.”

  • तुम्ही घटनास्थळी नसतानाही सुरक्षा, करार-प्रक्रिया आणि संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर येते. तुम्हाला ४८ तासांत अहवाल आणि शिफारसी सादर कराव्या लागतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com