Premium|Prof Dr Jyoti Waghmare Rajya Sabha MP : एका छोट्या गल्लीतून थेट संसदेपर्यंत; डॉ. ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीनंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीतील खळबळजनक खुलासे

Shiv Sena Shinde Group Rajya Sabha Candidates : सोलापूरच्या सुशिक्षित आणि आक्रमक नेत्या डॉ. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर झालेली निवड सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असून, वंचित घटकांचे प्रश्न आणि सोलापूरचा विकास हाच आपला मुख्य प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
Prof Dr Jyoti Waghmare Rajya Sabha MP

Prof Dr Jyoti Waghmare Rajya Sabha MP

esakal

Updated on

सोलापूरच्या सुशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकारिता, अध्यापन आणि आता थेट संसदेपर्यंत मारलेली ही झेप अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आधी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या राज्य प्रवक्त्या म्हणून केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी होती. आता त्या थेट राज्यसभेचे सभागृह गाजविणार आहेत. भल्याभल्यांना चकवा देत सोलापुरातील एका छोट्या गल्लीतील सामान्य घरातून थेट दिल्लीपर्यंत पोहोचलेल्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची सरकारनामाचे प्रतिनिधी प्रभू वारशेट्टी यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.

​राज्यसभा उमेदवारीची घोषणा झाली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला या निर्णयाची पूर्वकल्पना होती का?

खरं सांगू का, मला या उमेदवारीबाबत अजिबात कल्पना नव्हती. हा निर्णय माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित आणि सुखद धक्का होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अचानक हा निर्णय घेतला. एका सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट राज्यसभेची संधी मिळेल, असा विचारही मी केला नव्हता. ही संधी केवळ माझ्यासाठी नाही, तर तळागाळातील प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्यासाठी आशेचा किरण आहे.

तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे नेहमीच कौतुक करता. एक नेता म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता?

तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठी संधी देण्याची क्षमता आणि धाडस फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. हीच ती कार्यपद्धती आहे जी एकेकाळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती. सामान्य घरातील कार्यकर्त्याला निवडून आणणे, त्याला मोठे करणे आणि सत्तेच्या मुख्य प्रवाहात स्थान देणे हे शिंदे यांचे वैशिष्ट्य आहे. ते स्वतः २०-२२ तास काम करतात, त्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करताना आम्हालाही तीच ऊर्जा मिळते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com