
सध्या महाराष्ट्रातील वातावरण त्रिभाषा सूत्रावरून ढवळून निघाले आहे. याबाबतीत सर्वसामान्यांना काय वाटते, याची चाचपणी सुरूच आहे. सरकारनेही या मुद्द्यावर एक पाऊल पुढे टाकत याबाबत अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याची घोषणा केली. त्यामुळे या मुद्द्यावर ‘सकाळ’चे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी डॉ. जाधव यांच्याशी थेट संवाद साधला.