Premium| Drang Drung Glacier Ladakh : लडाखच्या रखरखीत पर्वतरांगांमध्ये पाण्याचा मोठा आधार! द्रांग-द्रुंग हिमनदीचं महत्त्व काय?

Climate Change : लडाखमधील द्रांग-द्रुंग हिमनदी ही केवळ निसर्गाचं अद्भुत दृश्य नसून झंस्कार खोऱ्यातील जलव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. हवामान बदलामुळे तिचा बर्फसाठा आणि विस्तार कमी होत असल्याने भविष्यातील जलसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
Drang Drung Glacier Ladakh

Drang Drung Glacier Ladakh

esakal

Updated on: 

हिमालयाच्या पश्चिमेकडील झंस्कार पर्वतरांगेत वसलेली द्रांग-द्रुंग ही लडाखमधील मोठ्या हिमनद्यांपैकी एक आहे. कारगिल जिल्ह्यातील झंस्कार प्रदेशात, पेन्सी ला या उंच पर्वतीय खिंडीच्या परिसरात तिचं भव्य रूप पाहायला मिळतं. सुमारे २४ किलोमीटर लांबीची आणि जवळपास ७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेली ही हिमनदी डोडा शिखराच्या परिसरातून खाली सरकते. पेन्सी ला खिंड ही झंस्कार आणि सुरू खोऱ्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या खिंडीजवळ पोहोचल्यावर दूरवर पसरलेली हिमनदी, तिच्या बाजूला उभे असलेले खडकाळ पर्वत आणि मधूनच दिसणारे बर्फाचे प्रवाह असं भव्य दृश्य नजरेसमोर उभं राहतं.

लडाखचा भूगोल समजून घेतल्याशिवाय द्रांग-द्रुंगचं महत्त्व लक्षात येणार नाही. हिमालयाच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र उंच पर्वतरांगांच्या पलीकडे असलेल्या लडाखमध्ये पर्जन्यमान अत्यल्प आहे. हा प्रदेश पर्जन्यछायेतील असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी ही अत्यंत मर्यादित नैसर्गिक संपत्ती आहे. इथल्या गावांमध्ये शेती, जनावरं आणि दैनंदिन गरजांसाठी वितळणाऱ्या बर्फातून निर्माण होणाऱ्या प्रवाहांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं. अशा परिस्थितीत हिमनद्या म्हणजे पर्वतांवरील नैसर्गिक जलसाठेच. हिवाळ्यात साठलेला बर्फ उन्हाळ्यात वितळतो आणि त्यातून निर्माण होणारं पाणी खालील नदीखोऱ्यांना आधार देतं.

Loading content, please wait...