Premium|Summer Health Care Tips : उन्हातून आल्यावर लगेच पाणी का पिऊ नये?उष्माघातापासून बचावासाठी तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन

Heatstroke Prevention Guide : उन्हाळ्याच्या वाढत्या तडाख्यात उष्माघात, पोटाचे विकार आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी भर उन्हातून आल्यावर लगेच पाणी न पिणे, भरपूर द्रवपदार्थ घेणे आणि दुपारची प्रदीर्घ झोप टाळणे यांसारख्या आरोग्यदायी सवयी अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे.
Summer Health Care Tips

Summer Health Care Tips

esakal

Updated on

डॉ. अविनाश भोंडवे

लक्षात असू द्या, भर दुपारच्या उन्हातून घामाघूम होऊन आल्यावर लगेच पाणी पिऊ नका. आल्यावर थोडावेळ शांत बसा. अंगातला घाम निथळू द्या. हवे तर टॉवेलने अंग पुसून घ्या. शरीर थोडे गार होऊ दे, मग हवे तेवढे साधे थंड पाणी प्या. उन्हातून आल्या आल्या पाणी पिण्याने होणारी सर्दी, डोकेदुखी असे त्रास अजिबात होणार नाहीत.

उन्हे तापलेली असताना, दुपारी जेवण झाल्यावर लगेच झोपण्याचा मोह होतो आणि उन्हाळ्याच्या दुपारी झोपही शांत लागते. पण शक्यतो जेवल्या जेवल्या लगेच आडवे होऊ नये आणि वामकुक्षी घेतल्यास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ नसावी. दुपारी झोपल्याने वजन तर अनियंत्रितपणे वाढतेच, पण ॲसिडिटी व अपचन हे विकारदेखील उद्‍भवतात.

फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीस, हवामानाचे रंग पालटायला लागतात, सूर्याची प्रखर किरणे लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. या काळात वातावरणाचे तापमान वाढू लागते, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि आपल्या अंगाची लाही लाही होण्यास सुरुवात होते. लहान मुले असोत किंवा ज्येष्ठ नागरिक, उन्हाळ्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. या काळात अनेक प्रकारचे आजार आणि विकार उद्‍भवू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com