Premium|US-Iran conflict impact : आखाती देशांतील क्षारविरहितीकरण प्रकल्पांवर हल्ले; पश्‍चिम आशियात पाण्याचे भीषण संकट

Middle East Geopolitical Conflict and Water Security : पश्‍चिम आशियातील वाढत्या संघर्षात आखाती देशांचे जीवनस्रोत असलेले क्षारविरहितीकरण प्रकल्प ड्रोन हल्ल्यांच्या विळख्यात आले असून, ९० टक्के पाणीपुरवठा धोक्यात आल्याने तेल संकटापेक्षाही भीषण जलसंकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
US-Iran conflict impact

US-Iran conflict impact

esakal

Updated on

आखाती प्रदेशात ४००हून अधिक क्षारविरहितीकरण प्रकल्प आहेत. हे प्रकल्प इथल्या बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सहा आखाती देशांत शहरी वापरासाठी ९० टक्के पाणी पुरवतात.

निः क्षारीकरण किंवा क्षारविरहितीकरण म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून क्षार आणि इतर खनिजे काढून टाकून ते पिण्यासाठी, शेतीसाठी किंवा उद्योगांसाठी उपयुक्त बनवण्याची प्रक्रिया. आखाती प्रदेशातील किमान चार ते पाच प्रमुख क्षारविरहितीकरण प्रकल्प नऊ एप्रिल २०२६ पर्यंत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे नुकसानग्रस्त किंवा लक्ष्य बनले आहेत आणि त्यामुळे पश्‍चिम आशियातील लाखो लोकांच्या पाणीपुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे. अमेरिका - इराणच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्य बनलेल्या क्षारविरहितीकरण प्रकल्पांमध्ये कुवेत, बहारीन, संयुक्त अरब अमिराती येथील ठिकाणे आणि इराणमधील एक बंद पडलेला प्रकल्प यांचा समावेश आहे. ‘‘हा संघर्ष जितका जास्त काळ चालेल, तितके पाण्याच्या या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे,’’ असे अटलांटिक कौन्सिलच्या सहायक संचालक जिंजर मॅचेट म्हणतात. युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल संकटापेक्षा पाण्याचे हे संकट आखाती देशांची काळजी वाढविणारे आहे.

आखाती प्रदेशात ४००हून अधिक क्षारविरहितीकरण प्रकल्प आहेत. हे प्रकल्प इथल्या बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सहा आखाती देशांत शहरी वापरासाठी ९० टक्के पाणी पुरवतात. हे देश जगातील सर्वाधिक पाणीटंचाई असलेल्या देशांपैकी आहेत आणि त्यांच्या ६२ दशलक्षांहून अधिक एकत्रित लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या क्षारविरहितीकरणावर अवलंबून आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com