

Durga Puja Festival
esakal
गोविंद कदम - kadamgovind@gmail.com
बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सव कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती, रोजगार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा मोठा सोहळा आहे. या उत्सवाची आर्थिक उलाढाल आता सुमारे ६५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. कपडे, फॅशन, किरकोळ व्यापार, खाद्यपदार्थ, कार्यक्रमांचे आयोजन, कलात्मक सजावट, मंडपउभारणी, प्रकाशयोजना आणि कंपन्यांच्या जाहिराती अशा विविध क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतात.
भारतातील विविध प्रदेशांत साजरी होणारी नवरात्र आणि दसरा यांना जोडूनच दुर्गोत्सव साजरा होतो. महाराष्ट्रापेक्षा गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये नवरात्र साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे. बंगसंस्कृतीतील प्रमुख देवता म्हणजे मोठ्या टपोऱ्या डोळ्यांची आणि गोबऱ्या गालांची देखणी दुर्गा. तिच्यासह लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या देवतांचीही पूजा केली जाते. बंगाली आणि ओडिया परंपरांमध्ये या चार देवता दुर्गादेवीची मुले मानली जातात. आपल्या मुलांना घेऊन दुर्गा माहेरपणाला येते, अशी श्रद्धा आहे. या पूजेचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे भव्यदिव्य आणि डोळे दिपवणारे पंडाल. दरवर्षी उत्सव मंडळे वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित पंडाल उभारतात. या अनोख्या उत्सवाचा अनुभव घेण्याची इच्छा गेल्या वर्षीच मनात निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा दुर्गापूजेच्या निमित्ताने कोलकात्याला भेट देण्याचे ठरवले. बंगालमध्ये नवरात्राच्या सातव्या दिवसापासून म्हणजे सप्तमीपासून ते दसऱ्यापर्यंत, अर्थात दशमीपर्यंत चार दिवस दुर्गापूजा साजरी केली जाते. १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान कोलकात्यात या उत्सवामुळे चैतन्य आणि उत्साह ओसंडून वाहत असल्याचा अनुभव आला.
बंगालमध्ये दुर्गापूजा हा केवळ धार्मिक उत्सव नसून कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती, रोजगार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा मोठा सोहळा आहे. या उत्सवाची आर्थिक उलाढाल आता सुमारे ६५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. कपडे, फॅशन, किरकोळ व्यापार, खाद्यपदार्थ, कार्यक्रमांचे आयोजन, कलात्म क सजावट, मंडपउभारणी, प्रकाशयोजना आणि कंपन्यांच्या जाहिराती अशा विविध क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतात.