

early childhood reading habits
esakal
रिता राममूर्ती गुप्ता - info@reetaramamurthygupta.in
केवळ आठवड्याला सुमारे १२ तास वाचनाचा वेळ दिला, तरी दोन वर्षांपासूनच मुलांच्या मेंदू, शिक्षण अन् एकूण आयुष्यात मोठा सकारात्मक बदल दिसू शकतो. वाचन म्हणजे शब्दांचा खेळ नाही; तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत पाया आहे. छोट्या सवयी मोठे बदल घडवू शकतात.
लहान वयात मुलांना वाचनाची गोडी लावणे म्हणजे त्यांच्या आयुष्याची मजबूत पायाभरणी करणे होय. विशेषतः दोन ते नऊ या वयोगटात वाचनाची सवय लागली; तर त्याचा खोल परिणाम मुलांच्या मेंदूच्या विकासावर होतो. संशोधनातून असे दिसून आले आहे, की या वयात आनंदासाठी वाचन केल्याने मेंदूच्या रचनेवर आणि त्याच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.