Premium|Study Room : भूकंप: कारणे, परिणाम आणि आपत्ती व्यवस्थापन

Richter Scale vs Mercalli Scale : भूकंप हा पृथ्वीतील ऊर्जा मुक्त झाल्यामुळे घडणारा नैसर्गिक भूगर्भीय प्रकार आहे. त्याची कारणे, भूकंपीय लहरी, केंद्रबिंदू, अधिकेंद्र आणि तीव्रता मोजण्याच्या पद्धती समजून घेणे महत्त्वाचे आहे.
Earthquake Causes

Earthquake Causes

esakal

Updated on

लेखक - सागर रेपाळे

भूकंप म्हणजे पृथ्वीच्या स्थलमंडलात (Lithosphere) अचानक ऊर्जा मुक्त झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाला बसणारे धक्के होत. या ऊर्जेमुळे भूकंपीय लहरी (Seismic Waves) निर्माण होतात आणि त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरतात. भूकंपाची प्रमुख कारणे म्हणजे प्लेट विवर्तनिकी (Plate Tectonics), भ्रंश (Faulting), घडीकरण (Folding), ज्वालामुखी उद्रेक तसेच धरणे, खाणकाम आणि अणुस्फोट यांसारख्या मानवनिर्मित क्रिया. लहान भूकंप वारंवार होत असले तरी मोठे भूकंप अत्यंत विनाशकारी ठरतात.

भूकंपाच्या अभ्यासात काही महत्त्वाच्या संज्ञा वापरल्या जातात. पृथ्वीच्या आत ज्या ठिकाणी भूकंपाची सुरुवात होते त्याला केंद्रबिंदू (Focus/Hypocenter) म्हणतात, तर त्याच्या थेट वर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बिंदूला अधिकेंद्र (Epicenter) म्हणतात. अधिकेंद्राजवळ भूकंपाचा परिणाम सर्वाधिक तीव्र असतो. रिष्टर स्केलवर प्रत्येक एकक वाढल्यास कंपांची तीव्रता सुमारे १० पट, तर ऊर्जा सुमारे ३१.६ पट वाढते. मर्केली स्केल (Mercalli Scale) मात्र भूकंपामुळे झालेल्या परिणामांची तीव्रता (Intensity) १ ते १२ या श्रेणीत मोजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com