
दहावी-बारावीपासून ते सीएच्या परीक्षांपर्यंत पहिल्या येणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होणाऱ्या मुली असतात पण मग पुढच्या आयुष्यात व्यवसाय आणि करिअरच्या पायऱ्यांवरून या पोरी कुठे गायब होतात? तिथे मुलींचे प्रमाण कमी का?
World Economic Forum चा नुकताच प्रकाशित झालेला 'ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट २०२५' भारतासाठी काही गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे. आपल्या देशातल्या मुली शिकतात. अगदी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतात. काही मुली मोठ-मोठ्या पदांवर रुजू होतात. पण काही 'फक्त' शिक्षणच घेतात आणि नोकरीकडे वळत नाहीत. का?
मग त्या शिक्षणांचे नंतर काय होते? त्या महिला पुढे नोकरी किंवा व्यवसाय का करत नाहीत? त्यांचा ‘आर्थिक आणि राजकीय सहभाग’ कमी असल्याचे या रिपोर्टमधून दिसून येते. ते कशामुळे? आशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ‘सकाळ प्लस’च्या या लेखातून मिळणार आहे.