
साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमकथेवर आधारित असलेलं ‘एक मुलाकात’ हिंदी-उर्दू नाटक पुन्हा नव्याने रंगमंचावर आलं आहे. काही विषय सदाबहार असतात. त्यावर साहित्य, नाटक वा सिनेमे येऊन गेलेले असले तरी त्यांच्यावर आधारित नव्याने सादरीकरण आलं तरी ते बघण्याचा मोह टाळता येत नाही. ‘एक मुलाकात’ त्यांपैकीच एक आहे...
काही विषय सदाबहार असतात. अशा विषयावर आलेलं साहित्य, नाटक, सिनेमे एकदा जरी बघितलेले असले तरी त्यांच्यावर आधारित नव्याने सादरीकरण आलं तरी ते बघण्याचा मोह टाळता येत नाही. साहिर आणि अमृता प्रीतम यांची प्रेमकहाणी हा असाच एक विषय आहे. या प्रेमकहाणीवर सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘एक मुलाकात’ हे नाटक आलं होतं. त्यात शेखर सुमनने साहिरची; तर दीप्ती नवलने अमृताची भूमिका साकारली होती. आता या नाटकाचे पुन्हा प्रयोग सुरू झाले असून दीप्ती नवलच्या ऐवजी आता गीतिका त्यागी आहेत.