मुंबई: मी चाळीस वर्षाचा नोकरदार.. घरात आई वडील दोन मुलं आणि मी असे राहतो.. आमचं घर तसं सुखवस्तू. खाऊन पिऊन सर्वजण सुखी. पण माझे वडील सतत आरोग्याच्या तक्रारी करतायेत. कधी त्यांना डोकं दुखतंय असं वाटतं, कधी त्यांना हात पाय गळाले आहेत असं वाटतं, ताप आलाय असं वाटत राहतं.. पण खरं तर त्यांना फार काही झालं नाही हे त्यांचे मेडिकल रिपोर्ट सांगतायत तरीही त्यांना सतत मला काहीतरी होतंय आणि त्यासाठी आता मी औषधे घेतली पाहिजेत, मी आता जगू शकत नाही, माझी मुलं माझ्याकडे लक्षच देत नाहीत अशा गोष्टी वाटू लागतायत..
सगळं सुखवस्तू असलं तरी घराचे हफ्ते, मुलांची शिक्षणं, नोकरी, कामाचा ताण आणि इतर जबाबदाऱ्या या सगळ्यातून जेव्हा मी जात असतो तेव्हा मलाही त्यांना नेमकं काय होतंय हे आपल्याला कळत नसतं आणि नेमकं कुठे आणि आणि कुणाचं चुकतंय हे कळत नाही.. एकुणातच या सगळ्या गोष्टींचा ताण यायला लागतो..
भारतातील खासकरून महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयीच्या तक्रारी दिसून येतात. यामध्ये अनेकदा टोकाचे स्वभाव दिसून येतात. काही ज्येष्ठ नागरिक आरोग्याकडे नको इतके दुर्लक्ष करतात तर काही पालक सतत मला काहीतरी होतंय या भीतीत जगताना दिसतात. जेव्हा घरांमध्ये अशी परिस्थिती असते अशा वेळी आपल्या पालकांना नेमकं काय होतंय हे कसं ओळखायचं..? यामागे काही मानसिक किंवा भावनिक लक्षणे आहेत का?
की ज्येष्ठ नागरिकांमध्ये काही हार्मोनल बदल होत असतात? यावर काय आणि कसा उपाय करायला हवा आणि हा ताण कसा हाताळायला हवा जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या विशेष लेखातून..