
सुनील चावके
‘आधार’-‘इपिक’ जोडणी अनिवार्य केल्याने राजकीय पक्षांना मतदारयाद्यांमध्ये बोगस मतदार घुसविणे सहजासहजी शक्य होणार नाही. पण त्यामुळे निवडणुकांशी संबंधित सर्व वादग्रस्त आणि कळीचे मुद्दे निकाली निघून लबाडीने निवडणुका जिंकण्याचे तंत्र पराभूत होईलच, याची शाश्वती नाही.