Election Fetigue
Esakal
पुणे - आजूबाजूला खूप काही घडते आहे, लोक एकमेकांना भिडलेत, पैशांचा पाऊस पाडला जातोय, आरोप प्रत्यारोप होतायेत, तुमचं पुढचं भविष्य घडविण्याच्या मोठमोठाल्या चर्चा केल्या जात आहेत तरीही तुम्ही या सगळ्यापासून बाजूला रहात शांत पण ‘शहाणी अलिप्तता’ स्विकारली आहे का?
मी कोणालाही मत दिले तरी शेवटी ते सोयीचे राजकारण करणार हा 'Learned Helplessness' म्हणजेच ‘शहाणी अगतिकता’ अनेक मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील महापालिकांच्या निकालाबाबत काहीशी अशीच स्थिती झाली आहे का? मतदान झाल्याची टक्केवारी या सगळ्याचा पुरावा देते आहे.
मानसशास्त्रात यासाठी Election Fatigue आणि Silent Voter अशा संकल्पना आहेत. ज्यावेळी राजकीय अस्थिरता आणि माहितीचा अतिरेक प्रमाणाबाहेर वाढतो त्यावेळी हे नकारात्मक भाव नागरिकांच्या मनात घर करू लागतात. या गोष्टी एकप्रकारचे सामुहिक नैराश्य असतात का? अशी मानसिकता होण्यासाठी काय गोष्टी कारणीभूत ठरलेल्या असतात आणि लोकशाहीला मारक ठरणाऱ्या या गोष्टींपासून स्वत:ला लांब ठेवणे मला शक्य आहे का? हे सगळं समजावून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखातून.