
प्रसाद नामजोशी
सोफी वयाच्या चौदाव्या वर्षापासून स्टार आहे. मधल्या काळात ती बॉन्ड गर्ल झाली. आणि बॉन्ड गर्ल होऊन बॉन्डच्या अवतीभवती नुसतीच बागडली नाही, तर त्याचा आयुष्यभर लक्षात राहील एवढा छळ करून मगच मरण पावली! सोफीचं वैशिष्ट्य असं, की खलनायिकेची भूमिका करून, बॉन्डच्या प्रेमात न पडता, कमीत कमी वेळ पडद्यावर दिसूनही द वर्ल्ड इज नॉट इनफमधल्या बॉन्ड गर्लसाठी गुगल सर्च केलंत, तर इलेक्ट्रा किंग हेच नाव सर्वप्रथम येईल. इसकू बोलते है बॉन्ड गर्ल!