
सम्राट फडणीस
(samrat.phadnis@esakal.com)
महाराष्ट्रामध्ये ई बाइक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे प्रवाशांना त्याचा फायदा होईलच, त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीमध्ये नवा पर्याय निर्माण होईल. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेतून वीस हजार रोजगार मिळणार, अशी चमकदार घोषणा करण्यापेक्षा एकूण इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणाचा आढावा आणि त्यातील त्रुटींची दुरुस्ती यावर भर द्यायला हवा होता. त्याचवेळी सार्वजनिक वाहतूक यंत्रणेसाठी एकात्मिक धोरणाचा विचार करणे, ही सर्वांत मोठी गरज आहे.