Premium|Trilinear Elon Musk: एलॉन मस्कचं ट्रिलेनियर होणं आणि जगभरातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेली भिती नेमकी काय? आणि का?

Space X : ही जागतिक अर्थव्यवस्था, लोकशाही आणि मध्यमवर्गासाठी धोक्याची घंटा आहे का?
Trilinear Elon Musk

Trilinear Elon Musk

esakal

Updated on

पुणे – “इथून पुढील काळात लोकांना काम करायची गरज नाही, एआय त्यांचं सगळं काम करेल. लोक हौस म्हणून शेती करतील”  असं विधान काहीच महिन्यांपूर्वी अमेरिकेतील उद्योजक एलॉन मस्क यांनी केलं आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एवढीच एलॉन मस्क यांची ओळख असती तर कदाचित तितकं या वाक्याला महत्त्व देखील नसतं. मात्र ट्रिलेनियर व्यक्ती म्हणून त्यांची नोंद होणं, पृथ्वीभोवती फिरत असलेल्या एकूण उपग्रहांपैकी दोन तृतीयांश उपग्रहांवर त्यांची मालकी असणं, स्टारलिंकच्या माध्यमातून जगभरातील इंटरनेटवर ज्यांचा ताबा असणं, मंगळावर मानवी वस्ती करण्याबाबत ज्यांचं प्लॅनिंग असणं अशा एलॉन मस्कचं कोणतंही विधान आता जगासाठी महत्त्वाची गोष्ट झाली आहे.

एलॉन मस्क यांचे ट्रिलियनियर बनणे हे केवळ एका व्यक्तीचे यश किंवा अपयश राहिले नाही. जगाची आर्थिक व्यवस्था, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि मानवी मूल्य या सगळ्यावर मोठा परिणाम घडवणारी ही घटना आहे. या एकूणातच विषयावर जगभरात काय मतमतांतरे आहेत, तज्ज्ञ कोणती भिती व्यक्त करत आहेत आणि भविष्यात काय धोके असू शकतात हे सगळं या सकाळ+ च्या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com