Elon Musk Trump Feudesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Musk Political Downfall: एलॉन मस्क विरुद्ध ट्रम्प, राजकीय मैत्रीतून कटुतेकडे
Elon Musk Trump Feud: एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील राजकीय मैत्री आता उघडपणे शत्रुत्वात बदलली असून, याचे पडसाद त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर उमटले आहेत
पूनम शर्मा
sakal.avtaran@gmail.com
मागील वर्षी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत एलॉन मस्क हे महत्त्वाची राजकीय ताकद म्हणून उदयास आले होते. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला २७ कोटी डॉलरची देणगी दिल्यामुळे ते प्रकाशझोतात आले. त्यांची आर्थिक ताकद आणि त्यांनी ट्रम्प यांना दिलेला जाहीर पाठिंबा यामुळे ट्रम्प पुन्हा निवडून येण्यातही मोठा हातभार लागला.
ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांची नियुक्ती नव्याने स्थापन केलेल्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (डीओजीई)मध्ये झाली. प्रशासकीय कामकाज सुरळीत व्हावे तसेच सरकारी उधळपट्टी थांबावी या हेतूने हे खाते निर्माण केले होते. यातील मस्क यांच्या कामकाजामुळे त्यांना प्रशासनातील अनभिषिक्त नेता असे स्थान मिळाले. त्यामुळे राजकीय किंगमेकर ही त्यांची ओळख आणखीन मजबूत झाली.