
शेखर गायकवाड, माजी साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य
सहकारातील महत्त्वाच्या साखर उद्योगापुढे मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. ऊस तोडणीसाठी सुलभ यंत्रसामग्रीचे संशोधन होणे, गरजेचे आहे. शेतकरी स्वत: ऊस तोडून वाहतूक करू शकला तर आजच ४० हजार रूपये प्रतिटनापर्यंत रक्कम थेट शेतकऱ्यांना मिळू शकेल.
रासायनिक खतांचा वापर कमीत कमी ठेवून जास्त उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञानही शेतकऱ्यांना शिकावे लागेल. भारत आणि साखर यांचा विचार करताना भारत, साखर व सुखी शेतकरी हेच गणित समोर ठेवावे लागेल हे नक्की !
देशात सुमारे पाच कोटी शेतकरी तर महाराष्ट्रात ४० लाख शेतकरी ऊसाचे पीक घेतात. भारताची साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल २.५ लाख कोटींच्या वर पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा १.१० लाख कोटी एवढा आहे. उसाच्या क्षेत्रात दरवर्षी वा ढ होत असून उसाचे क्षेत्र १४.८७ लाख हेक्टर एवढे झाले आहे.